Srimad Bhagavatam in Story Form- (Marathi)

200.00

SKU MRT080 Category Tag

Description

सुमारे पाच हजार वर्षांपूर्वी म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या अवतार समाप्तीनंतर एकदा शौनक ऋषींच्या नेतृत्वाखाली काही जेष्ठ-श्रेष्ठ मुनीवर्य यज्ञमालिका करण्यासाठी नैमिषारण्यात जमले होते. संपूर्ण विश्व तोलून धरण्यासाठी भगवान ब्रह्मदेवांनी जे सृष्टीचक्र निर्माण केले, त्याचा हे अरण्य म्हणजे एक अतिशय पवित्र असा भाग होता. येथे यज्ञ केल्यामुळे येऊ घातलेल्या कलियुगात जन्मास येणाऱ्या प्राणिमात्रांचे भले होईल आणि दुष्ट शक्तींचे सामर्थ्य घटेल अशी सर्व ऋषींची धारणा होती. अर्थात कलियगात सर्वाधिक महत्त्व फक्त संकीर्तन यज्ञाचेच राहील याची कल्पना असल्यामुळे ते सारेजण एक हजार वर्षेपर्यंत कृष्णकथेचे श्रवण करण्यास आणि परम शक्तिशाली परमेश्वरांचे भजन-पूजन करण्यास सज्ज झाले होते. ___ एक दिवस, अग्नीहोत्रादि सर्व प्रातःकर्मे आटोपल्यावर या ऋषींनी श्री सूत गोस्वामी यांना व्यासासानवर आदरपूर्वक स्थानापन्न करीत पुढील सहा प्रश्न विचारले. ते म्हणाले, “महर्षि आपण सर्वदृष्ट्या आदर्श असे भक्तराज असल्यामुळे भगवंतांनी आपल्याला सर्वज्ञ बनविले आहे. त्यामुळे सर्वसाधारण माणसाच्या भल्याचे काय, याचे विवेचन कृपया आपणच आम्हास करावे. या कलियुगात माणसाचे आयुष्य फार अल्प आणि नाना कटकटी व संघर्षाने ग्रासलेले राहणार आहे. त्यातून मुक्ती मिळविण्यासाठी माणसाने कसे वागावे, याचे दिग्दर्शन अनेक धर्मग्रंथात केले गेलेले आहे. आता कृपया त्यातील निवडक भागांची माहिती आपण आम्हाला द्यावी, ज्यायोगे मनुष्यमात्राचे जीवन सुखी होईल आणि त्यास पूर्ण समाधान लाभेल.” ___ “सूत गोस्वामी, माता देवकीच्या पोटी जन्मास येऊन भगवंत एका सामान्य मनुष्यमात्राचे जीवन का जगले? हे आपल्याला ज्ञात आहे. आता आम्ही सर्वजण आपल्याकडून भगवंतांच्या अवतारकार्याविषयी जाणून घेण्यास अतिशय उत्सुक आहोत. असे म्हणतात की, केवळ भगवंतांच्या पवित्र नामाचा जप केल्याने माणसाची जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून सुटका होते. यामुळेच तर नारद मुनींसारखे महान भगवद्भक्त सदैव ईश्वराचे नाव घेतात आणि त्याच्या लीलांचे गायन करतात. गंगेच्या पाण्यात स्नान केल्यामुळे मनुष्य हळूहळू पापमुक्त होतो, परंतु अशा श्रेष्ठ भक्तराजाच्या संपर्कात जे येतात त्यांना मात्र तत्काळ मुक्ती मिळते.”
“कृष्णकथा ऐकण्याचा आम्हाला कधीच कंटाळा येत नाही. भगवंतांशी ज्यांचे जिवा-भावाचे नाते जुळलेले आहे, अशा आपल्यासारख्या भक्ताकडून त्याच्या लीलांचे वर्णन पुनः पुन्हा ऐकण्यास आम्ही अतिशय उत्सुक आहोत. कृष्णावताराची समाप्ती झाली असल्यामुळे आता खरी धर्मतत्त्वे आम्हाला कोठे सापडू शकतील? या संदर्भात, पूर्वाचार्यांनी जे काही सांगून ठेवले आहे, ते आम्ही जाणू इच्छितो, कारण त्याच्या श्रवणाने व स्मरणानेच आमचा उद्धार होणार आहे.” या मागापर हा पालना ___ ऋषीगणांचे हे निवेदन ऐकल्यावर सूत गोस्वामींनी प्रथम आपले गुरू श्रील शुकदेव गोस्वामी यांचे श्रद्धापूर्वक स्मरण केले आणि ते म्हणाले, “मुनीजनहो, तुमचे प्रश्न भगवान श्रीकृष्णांशी संबंधित आणि सर्व विश्वाच्या कल्याणासाठी असल्याने अतिशय कौतुकास्पद आहेत. त्या जगन्नियंत्याची मनापासून सेवा व भक्ती करणे हाच सर्व मानवजातीचा धर्म वा सर्वोच्च कर्तव्य आहे. अर्थात् ही भक्ती कोणत्याही लाभाच्या इच्छेविना आणि पूर्णपणे ‘स्वांत समाधानाय’ अशीच असली पाहिजे. भक्तियोग हीच परिपूर्ण धार्मिकता असून, त्यात जे रममाण होतात त्यांना आपोआपच निराकारणी ज्ञानाची प्राप्ती होते आणि या भोगवादी जगापासून मुक्ती मिळते.”
माणसाचे आयुष्य हे स्वतःस जाणून घेण्यासाठी आहे, त्यामुळे ज्या गोष्टी आपले चित्त ईश्वराच्या संदेशाकडे वेधत

Additional information

Weight 0.509 kg
Dimensions 24 × 19 × 2 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “Srimad Bhagavatam in Story Form- (Marathi)”

Your email address will not be published. Required fields are marked *

×